गोंदिया जिल्ह्यातील कामठा येथील तक्रारदार शेतमजुरा कडुन प्रधानमंत्री आवास योजनेचे घरकुलाचे अनुदान जमा केले म्हणून दहा हजार रुपयाची लाच मागणारे कंत्राटी अभियंता, ग्राम पंचायत परिचर व खाजगी हॉटेल चालक यांचेवर कार्यवाही करून गोंदिया जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नववर्ष 2025 ची सुरुवात केली आहे .
जिल्ह्यातील कामठा येथील रहिवासी ५४वर्षिय तक्रारदार शेतमजुरा कडुन लाच मागणी करून स्विकारणारे गोंदिया पंचायत समितीचे गृहनिर्माण कंत्राटी अभियंता प्रमोद बीरसिंग उपवंशी वय ३८ वर्ष, रा.शारदा कॉलनी गोंदिया,
ग्रामपंचायत कामठा परीचर धनंजय मुन्नालाल तांडेकर 45रा. कामठा
हॉटेल चालक खाजगी ईसम विश्वनाथ गोविंदराव तरोणे वय 62 वर्ष धंदा हॉटेल ,राहणार लहरी आश्रम रोड कामठा,
यांना एक जानेवारी 25 रोजी दहा हजार रुपयाची लाच स्वीकारताना ताब्यात घेऊन रावणवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तक्रारदार शेतमजूर यांना शासनातर्फे मंजूर झालेले पंतप्रधान आवास योजनेचे घरकुलाची पहिला 15000 रुपये त्यांचे पोस्ट ऑफिस येथील खात्यात जमा करून दुसऱ्या हप्ता करिता दारू पी क्रमांक एक व दोन यांनी 27 11 24 रोजी चक्रधर यांचे घरी जाऊन त्यांची घराचे फोटो काढून दुसरा हप्ता 70 हजार रुपये त्यांची पोस्ट ऑफिसचे खात्यात जमा केल्याचे मोबदल्यात दहा हजार रुपयाची लाच आरोपी क्रमांक दोन यांचे मार्फत मागितली असता लास्ट लुचपत प्रतिबंधक विभागातर्फे या तक्रारीची शहानिशा 23/12/2024,
26/12/2024,
30/12/2024 व
31/12/2024 रोजी करून
01/01/2025 रोजी सापळा रचून
कामठा येथील हाॅटेल, मधे
आरोपी क्रमांक एक व दोन यांच्या सांगण्यावरून आरोपी क्रमांक तीन याने तक्रारदार यांचे कडून पंचासमक्ष 10,000/-रुपये लाच रक्कम स्वीकारली .लाच रकमेसह आरोपींना ताब्यात घेण्यात आले असुन पोलीस स्टेशन रावणवाडी जिल्हा गोंदिया येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर यशस्वी कामगिरी उपविभागीय अधिकारी विलास काळे, उमाकांत उगले
पोलीस निरीक्षक , स.फौ.चंद्रकांत करपे, पो. हवा. संजय कुमार बोहरे,मंगेश काहालकर, ना.पो.शि. संतोष शेंडे,संतोष बोपचे, अशोक कापसे, प्रशांत सोनेवाने, म.ना.पो.शि.संगीता पटले , रोहिणी डांगे, चालक नापोशि दिपक बाटबर्वे यांचे पथकाने केली.