नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील मंगेझरी सहवनपरीक्षेत्रात एका वाघाचा मृत्यू झाल्याची माहिती पसरताच सर्वत्र खळबळ उडाली असून शवविच्छेदन प्राथमिक अहवालानुसार या वाघाचा आपसी झुंजित मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे
आज दिनांक 22 सप्टेंबर रोजी नागझिरा व्याघ्र प्रकल्पात एका वाघाचा मृत्यू झाल्याची चर्चा सर्वत्र पसरल्याने अनेक शंका कुशकांना वाव मिळाला याबाबत नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ न शकल्याने एखाद्या वाघाची शिकार तर झाली नाही ना अशी शंका सर्वत्र पसरली होती
आज दिनांक 22 रोजी सकाळी दहा वाजता दरम्यान वनपरिक्षेत्र नागझिरा अभयारण्य क्षेत्र नागझिरा एक संकुल चे नियत क्षेत्र कक्ष क्रमांक 96 मंगेझरी रोड नागदेव पहाडी परिसरात बीट रक्षक जे एस केंद्रे हे आपल्या चमूसह नियमित गस्तीवर असताना त्यांना अंदाजे दहा वाजता दरम्यान एक नऊ ते दहा वर्षाचा नर वाघ मृत्य अवस्थेत आढळून आल्याने त्यांनी ताबडतोब वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिल्यावरून
जयराम गोंडा आर उपसरक्षक तथा क्षेत्र संचालक नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र गोंदिया, राहुल गवई उपसंचालक नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र साकोली, कुमारी एम एस चव्हाण सहायक वन संरक्षक (अतिरिक्त कार्यभार) नागझिरा वन्यजीव अभयारण्य साकोली व्ही एम भोसले वनपरिक्षेत्र अधिकारी नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र साकोली त्वरित घटनास्थळी दाखल होऊन राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण प्रमाणभूत कार्यपद्धती द्वारे समिती गठीत करून घटनास्थळ परिसराची व मृत वाघाची पाहणी केली यात सावन बहेकार मानद वन्यजीव रक्षक तथा प्रतिनिधी मुख्य वनरक्षक रुपेश निंबारते एनटीसी प्रतिनिधी छत्रपाल चौधरी एनजीओ प्रतिनिधी डॉक्टर शीतल वानखेडे डॉक्टर सौरभ कवठे डॉक्टर समीर शेंद्रे डॉक्टर उज्वल बावनथडे पशुवैद्यकीय अधिकारी यांचा समावेश होता या डॉक्टरांचे चमूने मृत वाघाचे शव विच्छेदन संबंधित समिती समोर करून व्हिसेरा सॅम्पल संकलित करून प्राथमिक अहवालानुसार हा वाघ T9 असून आपसी झुंजीत जबर जखमी होऊन मृत झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत असून या मृत वाघाचे सर्व अवयव शाबूत असल्याने समिती समोर या वाघाला अग्नी देण्यात आला असून पुढील तपास राहुल गवई उपसंचालक नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र साकोली यांचे मार्गदर्शनात व्ही एम भोसले वनपरिक्षेत्र अधिकारी साकोली करीत आहेत.