गोंदिया जिल्ह्यातील डाकराम सुकळी येथील जि. प. कनिष्ठ विद्यालयातील शिक्षकाचे विद्यार्थिनीशी गैरवर्तन

गोंदिया जिल्ह्यातील डाकराम सुकळी येथील जि. प. कनिष्ठ विद्यालयातील शिक्षकाचे विद्यार्थिनीशी गैरवर्तन

Ramakant Khobragade



 गोंदिया जिल्ह्यातील पंचायत समिती तिरोडा अंतर्गत येत असलेल्या डाकराम /सुकळी येथील जिल्हा परिषद कनिष्ठ विद्यालयाचे शिक्षकाने आपले शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीचे घरी जाऊन तिला अश्लील व्हिडिओ क्लिप दाखवून तिचे अंगावर हात फिरवून लज्जास्पद कृत केल्याने सदर विद्यार्थ्यांनीचे तक्रारी वरून या शिक्षकाविरुद्ध पोलीस स्टेशन तिरोडा येथे विनयभंग,बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून सदर घटनेचा तपास गोंदिया जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी तिरोडा साहिल झरक करीत आहेत.



      सध्या राज्यातील बदलापूर येथील शालेय विद्यार्थिनीशी अश्शिल कृत्य व  कलकत्ता येथील महिला डॉक्टरवर अत्याचार करून हत्या करण्याचे निंदनीय प्रकाराचे सर्वत्र निषेध करण्यात येत असून अशाच प्रकारची लज्जास्पद घटना गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील सुकळी/ डाकराम येथील जिल्हा परिषद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील मागासवर्गीय अल्पवयीन विद्यार्थिशी घडल्याने संपूर्ण जिल्ह्यात संतापाचे वातावरण पसरले असून


फिर्यादी विद्यार्थिनींनी दिलेले तक्रारीनुसार ती 22 ऑगस्ट रोजी शाळा सुटल्यानंतर आपले घरी गेली असता तिचे शाळेतील शिक्षक उमेश टीकाराम मेश्राम वय अंदाजे 50 वर्ष राहणार मेंढा हे तिचे मागे मागे तिचे घरी येऊन ती खुर्चीवर बसली असता सदर शिक्षकाने तिचे घरी पलंगावर बसून तू तिथे का बसली आहे माझे जवळ येऊन बस असे म्हटल्याने ही विद्यार्थिनी त्याचे जवळ जाऊन बसली असता या शिक्षकाने तुझे माझ्यावर प्रेम आहे का प्रेम करणे चुकीचे नाही असे म्हणत आपले मोबाईल मधून अश्लील व्हिडिओ क्लिप सदर विद्यार्थ्यांनीस दाखवली असता सदर विद्यार्थिनीने ही व्हिडिओ क्लिप पाहण्यास नकार दिल्याने शिक्षकाने तिचे केस धरून तिला आपले जवळ ओढून न तिला मिठी मारून अंगावरून हात फिरवून लज्जास्पद कृत्य केल्याची तक्रार फिर्यादी विद्यार्थिनीने 30 ऑगस्ट रोजी पोलीस स्टेशन तिरोडा येथे दिल्यावरून तिरोडा पोलिसांनी सदर शिक्षक उमेश टिकाराम मेश्राम याचे विरोधात अपराध क्रमांक 602 भारतीय न्याय संहिता कलम 74, 75,((1)((3)78,79,332, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियम (पोस्को),  व अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा नुसार गुन्हा नोंद करून सदर शिक्षकास अटक करुन पुढील तपास गोंदिया जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांचे मार्गदर्शनात तिरोडा उपविभागीय पोलिस अधिकारी साहिल झरकर करीत असून या निंदनीय प्रकरणाची पोलिसांनी कसून चौकशी करून विद्यार्थिशी गैरवर्तन करणारे शिक्षकास कठोर शिक्षा करावी अशी मागणी होत असून शिक्षकाने केलेल्या या गैरवरतचनाची दखल गोंदिया जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी मुरुनंगथम एम.यांनी त्वरित सदर शिक्षकाचे विरोधात कार्यवाही करत निलंबन केले आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Accept !