तिरोडा तालुक्यातील इंदोरा खुर्द गावच्या सरपंच रोजगार सेवकाकडून लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची जाळ्यात अडकल्याने तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे
आज दिनांक एक आक्टोंबर रोजी तिरोडा तालुक्यातील इंदोरा खुर्द येथील रोजगार सेवक यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया येथे नोंदवलेले तक्रारीनुसार त्यांची चार महिन्याचे बिलावर सही करण्याकरता येथील सरपंच संगीता सुनील तुमसरे 34 वर्ष यांनी 5000 रुपयाची लाच मागितल्याची तक्रार दील्याने तक्रारीची शहानिशा करून सापळा रचून लाच प्रतिबंधक विभागाने सरपंच यांना ताब्यात घेऊन तिरोडा पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवली आहे.
इंदोरा खुर्द येथील ग्राम रोजगार सेवक यांचे मार्च, एप्रिल मे व जून 24 वेतनाचे धनादेशावर येथील सचिवांनी सही करून धनादेश रोजगार सेवकाकडे दिला असता रोजगार सेवकाने हा धनादेश घेऊन सरपंचा सरिता तुमसरे यांचेकडे सही करता घेऊन गेला असता सरपंचा यांनी 5000 रुपयाची लाच मागितल्याने रोजगार सेवकास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया यांच्याकडे तक्रार नोंदवली या तक्रारीची आज दिनांक एक ऑक्टोंबर रोजीच शहानिशा करून संध्याकाळी विलास काळे पोलीस उपअधीक्षक, सहाय्यक फौजदार चंद्रकांत करपे, हवालदार संजय कुमार बोहरे ,मंगेश काहालाकर ,नायक पोलीस शिपाई संतोष बोपचे, अशोक कापसे, प्रशांत सोनवणे ,कैलास काटकर महिला पोलीस शिपाई संगीता पटले, रोहिणी डांगे ,चालक दीपक वाट बर्वे यांचे पथकाने इंदोरा खुर्द ग्रामपंचायत येथे सापळ रचून संध्याकाळी सरपंचा सरिता तुमसरे यांनी रोजगार सेवकाकडून 5000 रुपयाची लाच स्वीकारताना ताब्यात घेऊन तिरोडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद केला असून या घटनेमुळे तिरोड्या तालुक्यासह संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.