गिधाडी येथील कंत्राटी आरोग्यसेविकेकडून लाच घेणारे तालुका नियंत्रण पथक गोरेगाव येथील कंत्राटी लेखापालास गोंदिया लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पथकाने ताब्यात घेऊन गोरेगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवला आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र चोप्रा अंतर्गत उपकेंद्र गिधाडी येथे कार्यरत तक्रारदार कंत्राटी आरोग्य सेविका यांचे प्रोत्साहन भत्त्याचे 16,500 रुपयाचे बिल काढून दिल्याचा मोबदला म्हणून लोकसेवक कंत्राटी लेखापाल तालुका नियंत्रण पथक गोरेगाव यांनी 3000 हजार रुपये लाचेची मागणी करून 2500 रुपये तडजोड करून स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभाग गोंदियाचे पथकाने ताब्यात घेऊन गोरेगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवला आहे.
गोंदिया लाच लुचपत प्रतिबंधक विभागातर्फे देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकाप्रमाणे गोंदिया जिल्ह्यातील तालुका नियंत्रण पथक गोरेगाव येथील कंत्राटी लेखापाल लोकसेवक आरोपी सुरेश रामकिशोर शरणा 36 वर्ष यांनी चोपा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत गिधाडी उप केंद्र येथे कार्यरत कंत्राटी आरोग्य सेविका यांचे प्रोत्साहन भत्त्याचे 16500 रुपयाचे बिल काढून दिल्याचा मोबदला म्हणून 3000 रुपयाची लाच मागून 2500 रुपयात तडजोड केल्याची तक्रार कंत्राटी आरोग्य सेविकेने आज एक ऑगस्ट 24 रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया कार्यालयात केल्यावरून या तक्रारीची शहानिशा करून तालुका नियंत्रण पथक गोरेगांव येथील लोकसेवक कंत्राटी लेखापाल सुरेश रामकिशोर शरणागत 36 वर्ष यांनी पंचा समक्ष पंचवीसशे रुपयाची लाच स्वीकारताना गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक विलास काळे, पोलीस निरीक्षक उमाकांत उगले, अतुल तवाडे, हवालदार संजय कुमार बोहरे, मंगेश कहालकर, नायक पोलीस शिपाई संतोष शेंडे ,संतोष बोपचे, कैलास काटकर ,अशोक कापसे, प्रशांत सोनवणे, महिला पोलीस शिपाई संगीता पटले, रोहिणी डांगे ,चालक दीपक बाटबर्वे यांचे पथकाने यशस्वीरीत्या सापळा रचून आरोपी लोकसेवक सुरेश शरणागत यांना ताब्यात घेऊन गोरेगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवला आहे.