तिरोडा वडेगाव मार्गावर चालणाऱ्या तिरोडा व साकोली आगाराचे काही बस चालक वाहक विद्यार्थिनींना शिवीगाळ करून त्यांच्याशी गैरवर्तन करीत असल्याची तक्रार विद्यार्थीनींनी आमदार विजयकुमार रहांगडाले व तिरोडा एसटी आगार प्रमुखांकडे केली असून याबाबत आमदार विजय रहांगडाले यांनी त्वरित या विद्यार्थिनींचे तक्रारीची दखल घेत तिरोडा बस स्थानकवर येऊन आगार व्यवस्थापक व विभागीय नियंत्रकांशी चर्चा करून यापुढे विद्यार्थिनींशी कुठलेही गैरवर्तन होणार नाही अन्यथा संबंधितांवर कार्यवाही करू असे खडसावले
कुठलाही मुलगा किंवा मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून शासनाद्वारे विद्यार्थी विद्यार्थिनी करतात अनेक सोयी उपलब्ध करून देण्यात आले असून यातच विद्यार्थिनींना मानव विकासच्या बसमध्ये मोफत प्रवास व इतर बस मध्ये सवलतीच्या दरात पासेस उपलब्ध करून देण्यात आल्या असून तिरोडा वडेगाव मार्गावरील बीड सर येथील विद्यार्थिनींना बडेगाव येथे जाण्याकरता या मार्गावरून धावणाऱ्या तिरोडा साकोली बसणे प्रवास करावा लागत असून या बसेस पैकी काही चालक वाहक विद्यार्थिनींना बसमध्ये घेतच नाही किंवा घेतल्यास त्यांना शिवीगाळ करून त्यांच्याशी गैरवर्तन करीत असल्याचे तक्रार दिनांक 3 ऑगस्ट रोजी तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजयकुमार रहांगडाले यांचे कडे केल्यावरून आमदारांनी त्वरित त्वरित या तक्रारीची दखल घेत तिरोडा बस स्थानकावर घेऊन आगार व्यवस्थापक संजना पटले व भंडारा येथील नियम प्रकार भ्रमणध्वनी वरून चर्चा करून विद्यार्थ्यांनीशी गैरवर्तन करणारे चालक वाहकांवर योग्य ती कारवाई करावी व यापुढे या विद्यार्थिनींची कुठलीही गैरसोय होणार नाही किंवा केल्यास संबंधितांवर कडक कार्यवाही करावी अशी सूचना केली
यावेळी आगार व्यवस्थापक संजना पटले यांनी आपण सर्व चालक वाहकांना विद्यार्थिनींना बस मध्ये घेऊन कुठल्याही प्रकारचे गैरवर्तन होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना देऊन यापुढे विद्यार्थीनीशी कुठलीही गैरसोय होणार नाही किंवा गैरवर्तन होणार नाही याची काळजी घेऊ अशी ग्वाही दिली.