तिरोडा येथील बालरोग तज्ञ डॉक्टर स्नेहा तिरपुडे यांनी पहिले बाळंतपण सीजरने झालेल्या महिलेचे दुसरेही बाळंतपण सिजर होईल असा असलेला समज चुकीचा ठरवत बेलाटी खुर्द येथील महिलेचे पहिले बाळंतपण सिजरने गोंदिया येथील खाजगी रुग्णालयात झाले असताना दुसरे बाळंतपण उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे सामान्य रित्या करून पहिले बाळंतपण सिजरने झालेल्या महिलेचे दुसरेही बाळंतपण सिजरच होते हा समज चुकीचा ठरवला आहे.
डॉक्टर स्नेहातील पुढे तिरपुडे यांनी रुग्णालयात उपस्थित सिस्टर संगीता बनसोड शुभांगी हटवार स्वाती नारनवरे कुंदा सहारे व कंत्राटी मदतनीस यांचे सहकार्याने या महिलेची सामान्य रित्या बाळंतपण केले असता महिलेस दोन किलो 800 ग्रॅम वजनाचा मुलगा झाला बाळ व बाळंतीण सुखरूप असून कुठल्याही प्रकारचा त्रास नसूनही बायबायंती देखरेखी खाली उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले असून पहिले सीजन झाल्यास दुसरीही सिजर होते असा समज खोटा ठरवत तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध सोयीनुसार या महिलेचे बाळंतपण झाल्याने सर्वत्र महिला बालरोगतज्ञ स्नेहा तिरपुडे यांची वर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.