गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव पंचायत समिती येथे कार्यरत कंत्राटी अभियंता घरकुल लाभार्थ्याकडून सहा हजार रुपये लाच घेताना गोंदिया लाचलोचपत प्रतिबंधक विभागाचे जाळ्यात अडकला आहे
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील मोरगाव येथील रहिवाशी चाळीस वर्षीय इसमास यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलाचे तीन हप्त्याचे एक लक्ष दहा हजार रुपये खात्यात जमा झाल्याचे तसे उर्वरित 20,000 रुपयेचे बिलावर सही करण्याकरता कंत्राटी अभियंता अनिल धर्मराज मेश्राम यांनी 7हजार रुपयाचे लाचेची मागणी करून 6 हजार रुपयात समझोता केल्याची तक्रार गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे 12 सप्टेंबर रोजी केल्याने विभागाकडून या प्रकरणाची पडताळणी करून.
12 सप्टेंबर रोजी संध्याकाळी गोंदिया लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक विलास काळे पोलीस निरीक्षक राजीव कर्मलवार, उमाकांत उगले, सहायक फौजदार करपे,बोहरे, मंगेशकर कहालकर,नायक पोलीस शिपाई संतोष शेंडे ,अशोक कापसे, संतोष बोपचे, प्रशांत सोनवणे महिला शिपाई संगीता पटले, रोहिणी डांगे ,चालक दीपक बाटबर्वे यांचे पथकाने आरोपी लोकसेवक अनिल धर्मराज मेश्राम यांना पंचायत समिती मोरगाव अर्जुनी बांधकाम घरकुल विभागाचे कार्यालयात तक्रार दाराकडून सहा हजार रुपये लाच घेताना रंगेहात ताब्यात घेऊन अर्जुनी मोर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे.