गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांचे अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे झालेले नुकसानीचे नुकसान भरपाईची रक्कम त्वरित शेतकऱ्यांचे खात्यात जमा करा तिरोडा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक ओम पटले यांची मागणी.
तिरोडा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक ओम राधेलाल पटले यांनी शासनाकडे केलेले मागणीनुसार मे महिन्यात शेतकऱ्यांचे रब्बी धान पीक शेतात असता अतिवृष्टीमुळे तिरोडा विधानसभा क्षेत्रातील जवळपास दहा हजार पाचशे शेतकऱ्यांचे चार हजार दोनशे हेक्टर मधील धान पीक अतिवृष्टीमुळे खराब झाल्याने या शेतकऱ्यांचे शेताचे शासनाने कृषी विभाग ग्रामपंचायत सचिव तलाठी यांचे मार्फत पंचनामे करून अहवाल जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाकडे जाऊन जवळपास चार महिने लोटले असले तरी अजून पर्यंत शासनाने कोणत्याही शेतकऱ्याला नुकसान भरपाई दिली नसल्याने.
तसेच 9व10 सप्टेंबर रोजी संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात जोरदार पाऊस होऊन नदी नाल्यांना पूर आल्याने शेतकऱ्यांचे उभे धान खराब झाल्याने आधीच रब्बी हंगामात नुकसान झाल्याने अडचणी चाललेल्या शेतकऱ्याचे खरीप हंगामातही अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्याने कोणत्याही शेतकऱ्यांवर नुकसानीमुळे आत्महत्या सारखी दुर्दैवी वेळ येऊ नये म्हणून शासनाने मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाचे तसेच या महिन्यात अतिवृष्टीमुळे खरीप हंगामाचे धान पिकाचे नुकसान झालेले शेतकऱ्यांचे केवळ पंचनामे करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी न फुसका त्वरित अवकाळी पाऊस व अतिवृष्टीचे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई यांचे खात्यात जमा करावी अशी मागणी केली आहे.