विधानसभा सार्वत्रिक निवडणुक- 2024 व दिवाळी सणाचे पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक गोंदिया, गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांनी जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था शांतता अबाधित राहावी तसेच जनतेची सुरक्षितता लक्षात घेऊन खबरदारी म्हणून रेल्वे स्टेशन, बस स्थानक, विद्युत केंद्रे,अती संवेदनशील असलेली अतिमहत्वाची ठिकाणे श्वानाचे मदतीने तपासणी करण्याचे निर्देश श्वान पथक गोंदिया यांना दिलेले आहेत या अनुषंगाने दिनांक- 29/10/2024 रोजी चे 16/00 वा. श्वान पथक गोंदिया चे अधिकारी पोउपनि सतिश सिरीया यांचे सह श्वान हस्तक पो.हवा. विजय ठाकरे पो.शि. उमेश मारवाडे, चालक पो.हवा. भुमेश्वर बरेले, अंमली पदार्थ शोधक *श्वान लूसी* सह असे शासकीय वाहनाने चेकिंग कामी गेले असताना GRPF गोंदिया यांनी दिलेल्या माहिती वरुन प्लेटफॉर्म क्रं 3 वर गाडी संख्या- 12994 पुरी गांधीधाम एक्स्प्रेस मधील समोरील इंजीन पासून तिसऱ्या डब्यातील जनरल कोच मधुन 1 काळ्या रंगाच्या पिट्टठू बॅग अंमली पदार्थ शोधक *श्वान "लुसी' द्वारे* शोधून काढून हस्तगत करण्यात आले....सदर बॅग ची तपासणी व पाहणी केली असता सदर बॅगमध्ये उग्र वासाचे गांजा सदृश्य अंमली पदार्थ असल्याचे आढळून आले सदर बॅग मध्ये अंदाजे 6 किलो 0.85 किलो ग्राम वजनाचे अंमली पदार्थ गांजा अंदाजे किंमती 91 हजार 275/- रूपयांचे गांजा सदृश्य अंमली - पदार्थ मिळून आल्याने GRPF पोलीसाद्वारे जप्तीची प्रक्रिया करण्यात आली असून अंमली पदार्थ गांजा सदृश्य वस्तू GRPF पोलीसाचे स्वाधिन करण्यात आले आहे.....पुढील तपास कायदेशीर कारवाई प्रक्रिया GRPF गोंदिया रेल्वे पोलीस करित आहेत.