भंडारा आगाराची शिवशाही बस भंडारा वरून गोंदिया कडे जात असतात गोंदिया मार्गावरील खजरी डव्वा गावाजवळ पुलाचे कठड्याला धडक देऊन उलटल्याने बसमधील एका महिला पोलीस कर्मचाऱ्यासह 11 लोकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृतांची संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे.
भंडारा आगाराची शिवशाही बस क्रमांक एम एच ०९ इ एम 12 73 आज दिनांक 29 रोजी भंडारा येथून गोंदिया कडे जात असता दुपारी एक वाजता दरम्यान ही बस गोंदिया जवळील खजरी डव्वा गावाजवळील पुलाचे कठड्याला धडक देऊन उलटल्याने या बस मध्ये साप्ताहिक सुट्टी संपल्याने सडक अर्जुन येथील महिला पोलीस कर्मचारी आपले ड्युटीवर गोंदिया पोलीस मुख्यालयाकडे येत असता या भीषण अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला.
महिला पोलीस कर्मचाऱ्यासह 11 प्रवाशांचा या भीषण अपघातात मृत्यू झाला असून 15 ते 20 इसम जखमी झाल्याने त्यांना गोंदिया येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अपघात होताच जवळपासचे नागरिकांनी जखमींना व मृत्युकाचे प्रेत बाहेर काढले घटनास्थळी पोलीस प्रशासन व रुग्णवाहिका पोहोचले असून या भीषण अपघातामुळे गोंदिया जिल्ह्यात शोककळ पसरली आहे.