मतदानाचा टक्का वाढवण्या करता गोंदिया मुख्य कार्यपालन अधिकारी सामील झाले मोटार सायकल रॅलीत
Editor-
personRamakant Khobragade
Tuesday, November 12, 2024
share
गोंदिया जिल्ह्यात महिला मतदारांची पुरुष मतदारांपेक्षा संख्या जास्त असून यावेळी विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त महिलांनी मतदान करून मतदानाचा टक्का वाढावा म्हणून गोंदिया जिल्हा परिषद मुख्याधिकारी एम मुरूगंनाथम यांनी मोटार सायकल रॅलीत सहभाग घेऊन जनजागृती केली
विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा म्हणून राज्य निवडणूक आयोगातर्फे विविध कार्यक्रम राबवून जनजागृती करण्यात येत आहे याकरता 11 नोव्हेंबर रोजी गोंदिया जिल्ह्यात भव्य मोटार सायकल रॅलीचे आयोजन करून जनजागृती करण्याकरता जिल्ह्याचे रावणवाडी येथून भव्य मोटार सायकल रॅली काढण्यात आली या रॅली जिल्ह्याचे शिक्षण आरोग्य पंचायत बांधकाम घरकुल आधी विभागाचे अधिकारी कर्मचारी मुख्याध्यापक सहाय्यक शिक्षक कर्मचारी सामील झाले होते. ही रॅली जिल्ह्याचे रावणवाडी येथून सुरू होऊन परसवाडा करटी तिरोडा सुकळी फाटा सुकळी डाकराम क कुराडी गोरेगाव डव्वा सडक अर्जुनी मार्गे अर्जुनी मोरगाव जिल्ह्याचे शेवटचे टोकापर्यंत जाऊन जिल्ह्याचे चारही मतदारसंघाचे मतदारांमध्ये जनजागृती निर्माण करून सर्व पुरुष व महिला मतदारांनी राज्याचे विधानसभे करता 20 नोव्हेंबर 24 रोजी होणारे मतदाना करता मतदान केंद्रावर जाऊन मतदान करावे असा संदेश मोटारसायकल रॅलीतून देण्यात आला.
या रॅली संबोधित करताना गोंदिया जिल्हा स्वीप अधिकारी तथा मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया एम. मुरुगनाथम यांनी मार्गदर्शन करताना गोंदिया जिल्ह्यात पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या जास्त असून मागील निवडणुकीत जिल्ह्यात 65 टक्के मतदान झाले होते मात्र यावेळी 90% मतदान व्हावे असा प्रयत्न असुन याकरता या मोटरसायकल रॅली द्वारे जनजागृती करण्यात येत असून यात वृद्ध महिला पुरुष युवक युवती यांनी स्वेच्छेने मतदान केंद्रावर जाऊन कुठल्याही आमिषाला बळी न पडता मतदान करावे असे सांगितले.