विधानसभा निवडणुकीचे मतदानावर बहिष्काराचा निर्णय मागे घेण्यास आदिवासी बांधवांचा नकार

विधानसभा निवडणुकीचे मतदानावर बहिष्काराचा निर्णय मागे घेण्यास आदिवासी बांधवांचा नकार

Ramakant Khobragade

 गोंदिया जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र राज्यात आदिवासी गोंड गोवारी बांधवांनी 20 नोव्हेंबर रोजी होणारे विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार करण्याचा निर्णयाचे निवेदन शासनाचे सर्व जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना देऊन जोपर्यंत आम्हाला आमची मागणीनुसार यष्टि पवर्गात समाविष्ट केल्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही निवडणुकीवर टाकलेला बहिष्कार मागे घेणार नाही असा पवित्रा घेतला आहे. 

1985 पर्यंत आदिवासी गोंड गोवारी समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश होता मात्र शासनाचे चुकीचे निर्णयामुळे आमचे समाजास एसटी प्रवर्गातून वगळण्यात आल्याने समाजाकडून शासनाने आपली चूक दुरुस्त करून आमचे समाजात परत एसटी प्रवर्गात समाविष्ट करावे म्हणून लढा सुरू केला आमचा हा लढा सुरू असताना सतत धरणे आंदोलन व निवेदन देत होतो तसेच एकूण विषय 1994 साली महाराष्ट्र राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपुर येथे सुरू असताना आमचे समाजाचा मोठा मोर्चा विधानसभेवर येऊन विधान भवनात आम्हाला निवेदन देण्याची संधी द्या अशी मागणी केली असता आमचा मोर्चा थांबवून निवेदन देण्यापासून वंचित ठेवल्याने समाज बांधवात असंतोष निर्माण झाला व आमचा आवाज दाबण्या करता पोलिसांनी आमचेवर गोळीबार केल्याने चेंगराचेंगरी होऊन यात 114 आदिवासी गोंड गोवारी शहिद झालेत.
शासनाने आमचे आंदोलन मोडण्याचा प्रयत्न केला मात्र शहीद बांधवांचे बलिदान लक्षात घेऊन आम्ही आमचा लढा आणखी तीव्र करून  शासनाकडे अनेकदा निवेदने देऊन या समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश व्हावा म्हणून लढा सुरूच ठेवला असता 2018 मध्ये आमचे समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करून काही युवकांना शासकीय नोकऱ्या दिल्या मात्र या निर्णया विरोधात एसटी प्रवरगाणे न्यायालयात  धाव घेतल्याने त्यांनी स्टे घेऊन आमचे समाजाचे ज्या युवकांना नोकऱ्या मिळाल्या होत्या त्याही पदत घेऊन आमचे वरचा अन्याय सुरूच ठेवल्याने आमचा हा लढा सुरू असून न्यायालयाने आमचा एसटी प्रवर्गातील केलेला आदेश चुकीचा ठरवल्याने आम्ही परत आमची आंदोलन सुरू ठेवत 
26 जानेवारी 24 ते 11 फेब्रुवारी 24 पर्यंत मुंबई येथे आमरण उपोषण करून याकडे दुर्लक्ष केल्याने दोन ते तीन लक्ष आदिवासी गोंड गोवारी बांधवांनी रास्ता रोको केल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आम्हाला आश्वासन देऊन नक्कीच तुमची मागणी मान्य करू असे सांगितले असले तरी कुठलाही निर्णय न झाल्याने आदिवासी गोंड गोवारी जमात संविधान हक्क संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्य द्वारे शासन स्तरावर तसेच जिल्हास्तरावरील जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांना निवेदन देऊन या विधानसभा निवडणुकीवर आमचा बहिष्कार असल्याचे निवेदन दिल्यावरून 

 सहा नोव्हेंबर 24 रोजी 64 रोडा विधानसभा क्षेत्राचे स्वीप नोडल अधिकारी तथा गटशिक्षणाधिकारी विनोद चौधरी यांनी कोडे लोहारा गावाचे चीचटोला येथे मंडळ अधिकारी कुमारी एमबी रहांगडाले तलाठी कुमारी सूर्यवंशी बी एल ओ सविता मेश्राम तनुजा गेडाम सरपंच रवींद्र भगत तंटामुक्ती अध्यक्ष विनोद साखरे पोलीस पाटील फुलचंद टेकाम यांचे सह आदिवासी गुण गोवारी समाजाचे गणेश राऊत मोतीराम काळसर्पे रूप लाल वाघाडे भरत ठाकरे संजय नेवारे अमृत राऊत रमेश वाघाडे प्रवीण राऊत प्रदीप नेवारे अनिल वगारे चरणदास शेंद्रे भैय्याला लांबे डायरे संतोष राऊत नरेश वाघाडे प्रदीप राऊत यांचे सह या परिसरातील समाज बांधवांची निवडणुकीवरील बहिष्कार मागे घेऊन निवडणूक आयोगाचे मतदानाचा टक्का सहकार्य करावे वो आपले मतदानाचे कर्तव्य पार पाडून आपले आंदोलन सुरू ठेवावे असे सांगितले मात्र समाज बांधवांनी आम्ही आतापर्यंत सतत अन्याय सहन करत आलो असूनसुद्धा आता आमचे संघटनेने घेतलेले निर्णया याप्रमाणे आमचा एसटी प्रवर्गात समावेश होईपर्यंत आमचे आंदोलन सुरू राहणार असून मतदानावरील बहिष्कार कायम राहणार असल्याचे सांगितले.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Accept !