गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा वनपरिक्षेत्र अधिकारी व दोन क्षेत्र साहाय्यक याना रोपवन कामात अनियमितता व झाडावरून पडून मरण पावलेले व्यक्तीचा मृत्यू राणडुकराचे हल्ल्यात झाल्याचे प्रकरण तयार करून शासकीय निधीचा गैरवापर केल्याचा ठपका ठेऊन प्रादेशिक वनसंरक्षक यांचे आदेशावरून निलंबित केल्याचे आदेश उपवनसंरक्षक गोंदिया यांनी जारी केंल्यावरून तिरोडा वन परीक्षेत्र अधिकारी, क्षेत्र सहाय्यक तिरोडा व वडेगाव यांना 20 फेब्रुवारीचे आदेशावरून निलंबित करण्यात आले आहे .
उपवनसंरक्षक गोंदिया वन विभाग गोंदिया यांचे तर्फे 21 फेब्रुवारी रोजी जारी करण्यात आलेले आदेशानुसार तिरोडा वन परीक्षेचे अधिकारी आर.जी. मून, क्षेत्र सहाय्यक तिरोडा शैलेंद्र गुलाबराव पारधी व क्षेत्र सहाय्यक वडेगाव अब्दुल शकील अब्दुल दुर्रार्णी यांना वनसंरक्षक नागपूर यांचे आदेशानुसार निलंबित करण्यात आल्याने यांनी आपला पदभार दिलेले पत्रानुसार संबंधितांना देऊन पदम मुक्त व्हावे असे आदेश आज दिनांक 21 फेब्रुवारी रोजी जारी केले असून निलंबनाचे कारणा प्रमाणे तिरोडा वनपरिक्षेत्रां अतर्गत 1)खैरलांजी 1 रोपवन गट क्रमांक 559 /2, 560/2, 565/1, झुडपी जंगल क्षेत्र 13 हेक्टर आर,2) खैरलांजी 2 रोपवन कक्ष गट क्रमांक 630 व 637 झुडपी जंगल 7 हेक्टर आर, 3)माल्हि रोपवन कक्ष 884 झूडपी जंगल गट क्रमांक 270 व 271 क्षेत्र १० हेक्टर आर, 4)परसवाडा भाग 1 रोपवण कक्ष क्रमांक 899 झुडपी जंगल गट क्रमांक 759, 792 ,793, 779 क्षेत्र 14 हेक्टर आर, ईसापुर कक्ष क्रमांक 899 झूडपी जंगल गट क्रमांक 871 राखीव वन गट क्रमांक 9 व 68 ,89, 10 हेक्टर आर मध्ये प्रथम वर्ष सन 2024 पावसाळ्यातील लागवड केलेले रोपवन कामात अनियमितता तसेच सुमारे दोन वर्षा आधी सोनेगाव येथील गोविंद गोपी भगत यांचा झाडावरून पडून मृत्यू झाला असतानाही त्यांचा मृत्यू रानडुकराचे हल्ल्यात झाल्याचे खोटे प्रकरण तयार करून शासकीय निधीचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवून या वनसंरक्षक प्रादेशिक नागपूर यांचे पत्रानुसार निलंबन झाल्याने वनपरिक्षेत्र अधिकारी आर.जी.मून यांनी आपला पदभार आर.एस. भगत वनपरिक्षेत्र अधिकारी संरक्षण पथक 1यांना देऊन निलंबन काळात मून यांचे मुख्यालय प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी नवेगाव बांध येथे राहील तर शैलेंद्र गुलाबराव पारधी क्षेत्र सहाय्यक तिरोडा यांचे निलंबन काळात मुख्यालय वनपरिक्षेत्र अधिकारी सडक अर्जुनी येथे तर अब्दुल शकील अब्दुल दुर्रार्नी क्षेत्र सहाय्यक वडेगाव यांचे मुख्यालय वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय अजूनही मोर येथे राहणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.