कर्तव्यदक्ष प.स. सभापती यांचे प्रयत्नाने उघडले शाळेचे कुलुप ती
Thursday, July 31, 2025
शिक्षणाप्रती जागृक प.स.तिरोडा सभापती तेजराम चव्हाण यांनी 100 % मांग गारुडी समाजाचे विद्यार्थी असलेले भीम नगर शाळेस शिक्षक मिळवून दिल्याने पालकांनी सभापतींचा मान राखून शाळेला लावलेले कुलूप उघडल्याने शाळा नियमीत सुरू झालीतिरोडा तालुक्यातील शिक्षक कार्यरत असताना पाच जुलै रोजी एका शिक्षकाचा मृत्यू झाल्याने एकाच शिक्षिकेवर मुख्याध्यापक व सहाय्यक शिक्षकेचा भारत असल्याने येथील विद्यार्थ्यांना अध्यापनास अडचण येत असल्याने पालकांनी पंचायत समितीकडे शिक्षकाची मागणी करू नये शिक्षक उपलब्ध न झाल्याने 28 जुलै रोजी शाळेला कुलूप ठोकण्याची बातमी 30 तारखेची वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्याने जय समिती तिरोडाचे शिक्षणाप्रती जागरूक असलेले सभापती तेजरामजी चव्हाण यांनी या बातमीची दखल घेत भीमनगर (घोगरा) शाळेत सभापती तेजराम चव्हाण यांनी स्वतः प.स. सदस्या वनिता भांडारकर,पत्रकार रमाकांत खोब्रागडे, शिक्षण विस्तार अधिकारी अशोक बरीयेकर, अंबुले मुंडीकोटा केंद्रप्रमुख योगराज लांजेवार, अंगणवाडी पर्यवेक्षिका सौ पुष्पा भांडारकर यांचे सह शाळा गाठून शिक्षणाधिकारी स्नेहल रामटेके यांच्याशी चर्चा करून या शाळेत त्वरित एक शिक्षक देण्याची मागणी केल्यावरून शिक्षणाधिकाऱ्यांनी येडमाकोट शाळेतील एक शिक्षिका भजनी न्यायखोर ,यांची तात्पुरती नियुक्ती भीम नगर शाळेत केल्याने त्या शाळेत रुजू झाल्याने शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सीसम बिसणे, उपाध्यक्ष सौ सुषमा अमर बिसणे ,सदस्य सेरसिंगजी बिसणे, धरम उमे, गावकरी प्रकाश शेंडे, माजी सरपंच नथ्थूजी बिसणे , माजी सरपंचा गिताबाई व्यवहारे मनोजजी डोंगरे, यांनी सभापती तेजरामजी चव्हाण यांनी सर्व उपस्थित त्यांना यापुढेही शाळेची कुठलीही अडचण असल्यास माझ्याशी संपर्क साधा मी त्वरित ही अडचण दूर करील व येथे त्वरित एका शिक्षण सेवकाची नियुक्ती करता सरपंचांशी बोलून व्यवस्था करू असे सांगितले वरुन शाळेचे कुलूप उघडून शाळा सुरू करून शंभर टक्के मान गारुडी समाजाचे विद्यार्थ्यांनचे अभ्यासाचे नुकसान टाळले