जिल्हा आपत्ती व्यवस्थापन चमू तर्फे तिरोडा तालुक्यातील बोदलकसा जलाशय येथे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन चमू तर्फे तिरोडा तालुक्यातील बोदलकसा जलाशय येथे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण

Ramakant Khobragade

 

पावसाळ्याचे दिवसात जिल्ह्यात कुठेही पूर परिस्थितीवा इतर नैसर्गिक आपत्ती ओढवल्यास अशा प्रसंगी जीवित वा वित्तहानी होऊ नये किंवा झाल्यास कमीत कमी व्हावी म्हणून व्तरीत मदत कार्य करून जिवीत वा वित्तहानी टाळण्याचे अनुषंगाने




तहसील कार्यालय तिरोडा तर्फे गोंदिया जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख राजन चौबे यांचे पथका कडून उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड तहसीलदार एन एम ठाकरे पोलीस निरीक्षक अमित वानखडे नायक तहसीलदार अजय सकुंदरवार पत्रकार रमाकांत खोब्रागडे, जयंत शुक्ला ,अजय नंदागवळी,

सी जे पटेल महाविद्यालयाचे एनसीसी संचालक प्राध्यापक अक्षय चव्हाण, एनएसएस संचालक प्राध्यापक किसन गावित, एनसीसी एन एस एस सी चे विद्यार्थी नगरपरिषदेचे संजय नागपुरे ,भावेश सदाफळे, संजीव घोडेचोर, उमेश नेवारे, तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी तलाठी महसूल कर्मचारी व नागरिकांचे उपस्थितीत प्रात्यक्षिकासह बोदलकसा जलाशय येथे प्रशिक्षण देण्यात आले.

तसेच कुठल्याही नैसर्गिक आपत्तीचे वेळी तेथील शाळा ग्रामपंचायत तर्फे त्वरित मदतकार्य करण्याकरता उपाययोजना कशा करता येईल याबाबत ही माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख राजन चौबे यांनी दिली व जिल्ह्यातील आठही तालुक्यात स्थानीक 15 पट्टीचे पोहणाऱ्यांच्या टीम तयार ठेवण्यात येत असून पूर परिस्थितीत या टीम कडून पूरपीडितांचे रक्षण करण्यात येणार असून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कडून पहिल्यांदाच दिड किलोमीटर पर्यंत रिमोट कंट्रोल द्वारे संचलित होणारी जीवन नौका वापरण्यात येणार असल्याची माहिती राजन चौबे यांनी दिली.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Accept !