सध्या विधानसभा निवडणूक आचारसंहिता असून यादरम्यान कुठल्याही प्रकारचे अमली पदार्थ किंवा रक्कमेचा वापर होऊ नये म्हणून निवडणूक विभागा तर्फे वेगवेगळे पथक कार्यरत करण्यात आले असून आज दिनांक 11 नोव्हेंबर रोजी दुपारी 1-30 दरम्यान तिरोडा जवळील अदानी समोरून एक टाटा झेनॉन पिकप वाहन क्रमांक एम एच 12 एस. एफ.6302 जात असताना गोंदिया जिल्हा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर यांचे सहाय्यक प्रसाद सुरवसे यांचे पथकाने हे वाहन थांबवून विचारपूस केली असता हे वाहन हिताची कॅश मॅनेजमेंट सर्विस चे असून यांमध्ये 15 लक्ष रुपयाची रोकड असल्याचे सांगण्यात आले
यावरून उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे चमूने या व्हॅन वरील स्कॅनर स्कॅन केला असता ह्यांना आज फक्त गोंदियाचीच परवानगी असतानाही हे वाहन तिरोडा परिसरातून जात असल्याने त्यांनी 64 तिरोडा विधानसभा क्षेत्राचे एफ.एस.टी. पथक क्रमांक दोन प्रत्येक पथक प्रमुख संदीप मेश्राम यांना माहिती दिल्याने पथक क्रमांक दोन चे संदीप मेश्राम सहायक पथक प्रमुख लोकचंद विनायक पोलीस कर्मचारी तेनसिंग चौधरी यांनी त्वरित घटनास्थळ गाठून 15 लक्ष रुपये रोकड घेऊन जाणारे वाहन ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही करता 64
तिरोडा विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी पूजा गायकवाड यांचे ताब्यात दिले असून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र कोसकर यांनी निवडणूक आचारसंहिता सुरू असल्याने नागरिकांनी कुठलेही अमली पदार्थ व 50 हजारापेक्षा जास्त रक्कम घेऊन जाऊ नये असे आवाहन केले आहे याबाबत 64 तिरोडा विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी पूजा गायकवाड यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितल्यानुसार ही रक्कम जप्त करून याबाबत आयकर विभागास माहिती देऊन रक्कम कोषागार कार्यालयात जमा करून वाहन तिरोडा पोलीस स्टेशन येथे जमा करून पुढील योग्य कारवाई करू असे सांगितले आहे.