तिरोडा येथील रहिवासी माजी आमदार तथा गोंदिया जिल्हा काँग्रेस अध्यक्ष दिलीपभाऊ बनसोड यांना काँग्रेस पक्षाने जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी येथून उमेदवारी दिल्याने दिलीप भाऊ बनसोड आपले परिवारासह मोरगाव अर्जुनी परिसरात विधानसभेचे निवडणुकीचे धामधमी धाम धूमित प्रचारात व्यस्त असताना सात नोव्हेंबर रोजी रात्री त्यांचे घरात अज्ञात चोरट्नी भिंतीवरून उडी मारून प्रवेश करून घराचे लाकडी दाराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून त्यांची बेडरूम मधील गोदरेजचे कपाट उघडून त्यातील सामान असता व्यस्त करून कपाटातील सोन्याचे दागिने अंदाजे किंमत दोन लक्ष 97 हजार पाचशे रुपये व दीड लक्ष रुपये नगदी असा एकूण अंदाजे चार लक्ष 50 हजार रुपयाचा ऐवज घेऊन पसार झाले.
या चोरीची तक्रार दिलीप भाऊ बनसोड यांचे वाहन चालक सोमप्रकाश बिसेन यांनी तिरोडा पोलीस स्टेशन येथे माहिती देताच पोलीस निरीक्षक यांनी त्वरित या घटनेची माहिती वरिष्ठांना दिल्यावरून गोंदिया जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे उपविभागीय पोलिस अधिकारी तिरोडा साहिल झरकर पोलीस निरीक्षक अमित वनखडे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळ गाठून त्वरित गोंदिया वरून ठसे तज्ञ व श्वान बोलावून शोधू त्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला असता श्वान काही अंतरावर जाऊन परत आल्याने शोध त्यांनी तेथून एखाद्या वाहनाने पळ काढला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत असून
ऐन विधानसभा निवडणुकीचे धामधुमीत काँग्रेस उमेदवाराचे घरीच चोरट्यांनी हात साफ केल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून गोंदिया जिल्हा गुन्हे शाखा व तिरोडा पोलीस या चोरीचा कसून तपास करीत असून दिलीभाऊ बनसोड यांचे वाहन चालक ओमप्रकाश बिसेन याचे तक्रारीवरून तिरोडा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 331 ((4) 305 (a) नुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे व तिरोडा उपविभागीय पोलीस अधिकारी साहिल झरकर यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक तिरोडा अमित वनखेडे तपास करीत आहेत.