गोंदिया जिल्ह्यातील अदानी वीज निर्मिती प्रकल्पातील कंत्राटी कामगाराचा मृत्यू
Sunday, March 30, 2025
गोदिया जिल्ह्यातील तिरोडा येथे असलेल्या अदानी विज निर्मिती प्रकल्पात चार दिवसापूर्वी कंत्राटी कामगार म्हणून लागलेल्या मध्य प्रदेशातील दिंडोरी जिल्ह्यातील कामगाराचा कोळसा वाहून नेणारे ट्रॉलीत दबून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना 29 रोजी घडली असून आपले रास्त मागण्याकरिता मागील दहा दिवसापासून आंदोलनावर असलेले कंत्राटी कामगारांचा संप सूरू असतांनाच या कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाल्याने अदानी वीज प्रकल्पातील कामगारांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे.तिरोडा येथील अदानी वीज निर्मिती प्रकल्पातील कंत्राटी कामगारांनी आपले रास्त वीस मागण्यांकरिता 20 मार्चपासून 23 मार्च पर्यंत साखळी उपोषण व 24 मार्चपासून आमरण उपोषण आंदोलन सुरू केले असून दहा दिवस होऊनही या कामगारांचे मागण्याबाबत कुठल्याही तडजोडी करता अदानी प्रकल्प किंवा शासकीय प्रशासनाने कुठलाही प्रयत्न केला नसताना अदानी प्रकल्पातील वीज निर्मिती विनाअडथळा सुरू राहावी म्हणून या प्रकल्पात इतर प्रदेशातून काही कंत्राटी कामगार मागवण्यात आले असून केवळ चार दिवसापूर्वी मध्य प्रदेशातील दिंडोरी जिल्ह्यातील सहपूर तालुक्यातील सरईमाल गावातील काही इसमासह संजय यादव 40 वर्ष हा कामगार कंत्राटदारा मार्फत कंत्राटी मजूर म्हणून कामावर लागला असता 29 मार्च रोजी सकाळी 11वाजता चे दरम्यान कोळसा वाहून नेणारे दोन ट्रॉलीचे मध्ये दबून गंभीर जखमी झाला असता अदानी वीज प्रकल्पातर्फे त्याला गोंदिया येथे उपचाराकरता खाजगी रुग्णालयात नेण्यात आले मात्र त्याची परिस्थिती चिंताजनक असल्यामुळे नागपूरला नेण्याचा सल्ला देण्यात आला असता नागपूरला नेत असताना दुपारी 2 वाजता दरम्यान जखमी कंत्राटी मजुराचा मृत्यू झाल्याने 30 रोजी नागपूर येथे त्यांचे शव विच्छेदन करून प्रेत नातेवाईकांचे स्वाधीन करण्यात आले असून आपले रास्त मागण्यांकरिता मागील 10 दिवसापासून आंदोलन सुरू असतानांच एका कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाल्याने कामगारांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले असून आतातरी प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेऊन कामगारांच्या मागण्याविषयी सकारात्मक भूमिका घ्यावी अशी अपेक्षा कामगार व्यक्त करीत आहेत.