44% वेतन कपातीमुळे राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांमध्ये नैराश्याचे वातावरण

44% वेतन कपातीमुळे राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांमध्ये नैराश्याचे वातावरण

Ramakant Khobragade


 महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे चालक वाहक तांत्रिक कर्मचाऱ्यांसह अंदाजे 88 हजार कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतन कपात करून केवळ 56 टक्के वेतन दिल्याने या कर्मचाऱ्यांमध्ये नैराश्य पसरले असून आधीच कमी वेतन मिळणारे कर्मचाऱ्यांना एसटी महामंडळाने आणखी अडचणीत न आणता त्वरित उर्वरित वेतन द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.


 राज्य परिवहन महामंडळाचे प्रवाशांचे सेवेसाठी हे ब्रीदवाक्य असले तरी परिवहन मंडळाच्या अनेक आगारात बसेसची संख्या खूप कमी असून उपलब्ध बसेस मधून अनेक बसेस खिळखिळ्या झाल्या असल्याने या बसेस अनेकदा रस्त्यात नादुरुस्त होत असल्याने बसेस मधील विद्यार्थी चाकरमानी महिला व इतर प्रवाशांना आपले गंतव्य स्थानी वेळेवर पोहोचता येत नसल्याने या सर्व प्रवाशांचा रोष चालक वाहकांवर प्रवासी काढत असून बसेसची संख्या कमी असल्याने अनेक स्थानकावर विद्यार्थी महिला व इतर प्रवासी ताटकळत उभे राहत असल्यामुळे बसेसच्या क्षमतेपेक्षा कितीतरी जास्त प्रवासी बसेस मध्ये नेऊन ऊन, पाऊस न पाहता आपले कर्तव्य योग्य प्रकारे बजावत असलेले या कर्मचाऱ्यांच्या सोयी करता महामंडळातर्फे कुठल्याही उपाययोजना न करता त्यांना मिळत असलेल्या पगारही ठरलेल्या तारखेवर न मिळता आठ पंधरा दिवस उशिरा मिळत असल्याने या कर्मचाऱ्यांना आपले परिवाराचा गाडा चालवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून या

अडचणी कमी का म्हणून या कर्मचाऱ्यांचा मार्च महिन्याचा पगारात महामंडळातर्फे 44 टक्के कपात करून केवळ 56% पगार देण्यात आल्याने राज्यातील जवळपास 88 हजार कर्मचाऱ्यांनपुढे मोठे संकट ओढवले असून यात आई वडील व परिवाराचे औषध पाण्याचा खर्च,मुलांच्या ऍडमिशन शैक्षणिक खर्च औषध पाण्याच्या खर्च, सध्या लग्नाचा मोसम असल्याने अतीरीक्त खर्च तसेच वाहन वा इतर कामाकरता काढलेले कर्जाचे हप्ते कसे भरावे अशा समस्या उद्भवल्या असून यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे चालक वाहक व इतर कर्मचाऱ्यांमध्ये नैराशेचे वातावरण पसरले असून काही कर्मचाऱ्यांनी या विवंचने मुळे सुट्टयाही घेतल्या असून महामंडळाने कर्मचाऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्वरित उर्वरित 44% वेतनाची रक्कम देउन कर्मचाऱ्यांवर आलेले संकट दूर करावे अशी आशा व्यक्त केली आहे.



Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Accept !