राज्याचे 100 दिवसीय कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात गोंदिया जिल्ह्यातील दोन पोलीस उपविभागीय कार्यालय व दोन पोलीस स्टेशनने मूल्यांकनात मिळवले प्रथम व तृतीय स्थान

राज्याचे 100 दिवसीय कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात गोंदिया जिल्ह्यातील दोन पोलीस उपविभागीय कार्यालय व दोन पोलीस स्टेशनने मूल्यांकनात मिळवले प्रथम व तृतीय स्थान

Ramakant Khobragade


 शंभर दिवसांचे कार्यालयीन सुधारणांचे विशेष मोहिमेत नागपूर विभाग स्तरावर दुसऱ्या टप्प्यात गोंदिया पोलीस विभागातील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याला प्रथम तर तिरोडा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालया तृतीय. तर पोलीस स्टेशन विभागात गोंदिया शहर प्रथम व तिरोडा पोलीस स्टेशन तृतीय

जानेवारी 2025 मध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस  यांच्ये संकल्पनेतून साकार झालेल्या महाराष्ट्र शासनाचे 100 दिवसांच्या विशेष कार्यक्रमांची उद्दिष्ट लोककेंद्रीत उपक्रम, तंत्रज्ञान केंद्रित योजना आणि प्रभावी कामगिरी द्वारे राज्याच्या प्रगतीला चालना देणे होते... माननीय मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखालील या कार्यक्रमात 48 विभागासाठी महत्त्वाकांक्षी लक्ष ठेवण्यात आलेले होते या अनुषंगाने द 7 जानेवारी, 2025 ते 16 एप्रिल 2025 पर्यंत महाराष्ट्र राज्याचे सर्व शासकीय कार्यालयांना, कार्यालयीन सुधारणा करण्यासाठी, 100 दिवसांचा सात कलमी सुधारणा कार्यक्रम आखून दिला होता.

सदर कार्यक्रमांतर्गत, क्षेत्रीय कार्यालयासाठी संकेतस्थळ, कार्यालयीन सुधारणा, नागरिकांसाठी पुरवण्यात येणाऱ्या सेवांचे सुलभिकरण, जुन्या अभिलेखांचे निंदनीकरण व निर्लेखन, कालबाह्य वस्तू व वाहनांची विल्हेवाट, कार्यालयाने राबविलेल्या नाविन्यपूर्ण योजना इत्यादी विषयांवर कामकाज करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
उपरोक्त कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी ठरवून दिलेली शंभर दिवसांची मुदत दिनांक 16 एप्रिल रोजी संपल्यानंतर, दुसऱ्या टप्प्यात विभाग स्तरावर सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावलेली महाराष्ट्रातील तालुका स्तरावरील क्षेत्रीय शासकीय कार्यालये ज्यात नागपूर विभाग स्तरावरील जिल्हा पोलीस दलातील तालुका स्तरावरील कार्यालयाने केलेल्या कामगिरीचे मूल्यमापन प्रथम पोलीस अधीक्षक कार्यालय, तदनंतर नागपूर परिक्षेत्र, कार्यालय आणि मा. पोलीस महासंचालक कार्यालयाकडून करण्यात येऊन, त्यातून 3 कार्यालयांची निवड करण्यात आली होती.


       यात तालुका स्तरावरील शासकीय कार्यालये यांनी केलेल्या कामगिरीचे गुणांकनाचे आधारावर मूल्यमापन करण्यात येवून... नागपूर विभाग स्तरावर पोलीस विभागातील गोंदिया जिल्ह्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी, देवरी यांचे कार्यालय- प्रथम तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, तिरोडा यांचे कार्यालय- तृतीय, तर पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे गोंदिया शहर-प्रथम तर पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे तिरोडा- तृतीय यांची निवड करण्यात आलेली आहे.


  पोलीस अधीक्षक गोंदिया गोरख भामरे, व अप्पर पोलीस अधीक्षक गोंदिया कॅम्प देवरी  नित्यानंद झा यांचे उत्तम मार्गदर्शनात व देखरेखीखाली उपविभागीय पोलीस अधिकारी, कार्यालय देवरी, तिरोडा तसेच पोलीस ठाणे गोंदिया शहर आणि पोलीस ठाणे तिरोडा येथील पोलीस अधिकारी, अंमलदार यांनी अहोरात्र घेतलेली मेहनत, अथक परिश्रमामुळेच सदरचे यश शक्य आहे.


        पोलीस अधीक्षक गोंदिया गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक  नित्यानंद झा, यांनी महाराष्ट्र शासनातर्फे शंभर दिवसांची कार्यालयीन सुधारणांच्या विशेष मोहिमेमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल  विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी, साहिल झरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, तिरोडा, पोलीस निरीक्षक किशोर पर्वते, पो ठाणे गोंदिया शहर, पोलीस निरीक्षक अमित वानखडे , पो.ठाणे तिरोडा, तसेच विशेष मोहिमे करीता मेहनत घेऊन अथक परिश्रम, उत्तम सादरीकरण करणारे सपोनी.  ओम गेडाम, सपोनी.  नागरगोजे, पो.उपनी. श्रीकांत हत्तीमारे, पोलिस अधीक्षक कार्यालय गोंदिया यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Accept !