गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील परसवाडा येथे दोन वर्षांपूर्वी सामूहिक विवाह सोहळ्यात तीन बालविवाह लावण्यात आल्याचे गुपित तक्रारी वरुन उघड झाले असून संबंधित संस्थेचे दहा ट्रस्टींवर गुन्हा दाखल झाला असून नियमाप्रमाणे या सोहळ्यात उपस्थित पाहुणे व पालकांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
परसवाडा हनुमान मंदिर ट्रस्टचे 6 एप्रिल 2023 रोजी आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात सात विवाह लावण्यात आले यात तीन जोडप्यातील वर 21 वर्षापेक्षा कमी वय असल्याने हे विवाह बालविवाह असल्याचे जिल्हा महिला बाल विकास प्रकल्पाचे चौकशीत उघड झाले असून परसवाडा ग्रामपंचायत चे ग्राम विकास अधिकारी तथा बालविवाह प्रतिबंधक अधिकारी नितीन बिसेन यांचे तक्रारीवरून पोलीस स्टेशन दवणीवाडा येथे दहा ट्रस्टीन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हनुमान मंदिर ट्रस्ट तर्फे 6 एप्रिल 23 रोजी लावण्यात आलेले सामूहिक विवाह सोहळ्यात तीन अल्पवयीन मुलांचे विवाह लावण्यात आल्याने यापैकी एका ग्रामपंचायतीस मूल झाल्यावर या मुलाचे आधार कार्ड बनवण्यास गेले असता वडील अल्पवयीन असल्याने आधार कार्ड बनवण्यासाठी या युवकांनी परसवाडा येथील सामाजिक कार्यकर्ता राकेश वैद्य यांच्याकडे आपली अडचण मांडली असता त्यांना या विवाह सोहळ्यात बालविवाह लावण्यात आल्याची दिसून आल्यावरून त्यांनी याची तक्रार जिल्हाधिकारी गोंदिया, पोलीस अधीक्षक गोंदिया, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी गोंदिया ,उपविभागीय पोलिस अधिकारी तिरोडा, उपविभागीय अधिकारी तिरोडा,तहसीलदार तिरोडा यांचेकडे केल्यावरूनजिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांचे कडून सात सदस्यांची चौकशी समिती तयार करून या चौकशी समितीकडून प्रत्यक्षरीत्या विवाह सोहळ्यात झालेले सर्व स्वातही जोडप्यांची व परिवारांची बयान नोंदवून त्यांच्याकडून योग्य ती कागदपत्रे मिळवून तसेच हनुमान मंदिर ट्रस्ट कडून नाही काही कागदपत्रे व ट्रस्टीनचे बयान नोंदवल्या वरून चौकशी समितीचे अहवाला तीन बालविवाह झाल्याचे स्पष्ट झाल्याबद्दल बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 नुसार 21 वर्षापेक्षा कमी वर व अठरा वर्षापेक्षा कमी वयाची वधू असल्यास हा बालविवाह ठरत असून या विवाहात उपस्थित व पालकांवर गुन्हा दाखल करण्याचे प्रावधान असल्याने समितीचे अहवालावरून परसवाडा ग्रामपंचायतचे ग्राम विकास अधिकारी तसेच बालविवाह प्रतिबंधक अधिकारी नितीन बिसेन यांनी दवनीवाडा पोलीस स्टेशनला दिलेले तक्रारीवरून दहा ट्रस्टिवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या सामूहिक विवाह सोहळ्यात उपस्थित असलेले पाहुणेमंडळी व बालविवाह लावणारे पालकांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.