जिल्हाधिकारी गोंदिया प्रजित नायर यांनी तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा व घोगरा परिसरात राहणारे मांगारोडी समाजाचे नागरिकांना प्रमाणपत्र वितरणा करिता
तिरोडा पंचायत समितीज्ञ सभागृहात आयोजित कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन करताना देशाला स्वातंत्र्य मिळवून 78 वर्ष झाले असले तरी मांग गारुडी समाजाचे नागरिक सर्वसाधारण समाजापेक्षा दूर राहिल्याने सामाजिक शैक्षणिक व शासनाचे सर्वच योजनांचे लाभांपासून वंचित राहिला ही दुःखाची बाब असूनजेशासनाचे धोरणाप्रमाणे मागील वर्षीपासून गोंदिया जिल्ह्यात मांग गारुडी समाजाचे नागरिकांना जात प्रमाणपत्र देण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला असून याआधी गोंदिया व देवरी परिसरातील मांग गारुडी समाजाचे नागरिकांना जात प्रमाणपत्र देण्यात आले असून
तिरोडा तालुक्यातील मांग गारुडी समाजाचे नागरिकांकरता उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड, तहसीलदार एन. एम. ठाकरे ,त्यांचे अधिनस्त नायब तहसीलदार,सर्व मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल,यांनी या समाजाचे लोकांचे घरोघरी जाऊन जात प्रमाणपत्रा करता आवश्यक कागदपत्रे गोळा करून घेतलेले शिबिरात 700 अर्ज आले यापैकी सर्व कागदपत्राची तपासणी केली असता 641 प्रकरणात जात प्रमाणपत्र तयार करण्यात आले असून आज येथे वितरित करण्यात आले असून उर्वरित प्रकरणे आवश्यक कागदपत्रांची जुळवाजवळ करून निकाली काढून त्यांनाही जात प्रमाणपत्र देणार असून जात प्रमाणपत्र मिळाल्याने हा समाज समाजाचे मुख्य धारेत येणार असून या समाजाचे नागरिक आता शैक्षणिक, सामाजिक, आरक्षणाचे लाभ घेऊ शकणार असून या समाजाकरिता ही नवी सुरवात असून आता या समाजाचे नागरिकांनी स्वतः समोर येऊन आपले समाजाची उन्नती करून घ्यावी असे सांगितले .
महसूल विभागाचे छत्रपती शिवाजी महाराज महा अभियान अंतर्गत पंचायत समिती तिरोडाचे सभागृहात दोन जुलै रोजी जिल्हाधिकारी प्रजित नायर यांचे अध्यक्षतेत आयोजित समारोहात उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड तहसीलदार एन. एम. ठाकरे ,गटविकास अधिकारी अरुण गिरीपुंजे, पोलीस निरीक्षक अमित वानखडे, भटक्या विमुक्त कल्याण समितीचे प्राध्यापक प्रशांत बोरसे, नगरपरिषद मुख्याधिकारी अमोल मालकर,जिल्हा परिषद सदस्य किरण पारधी , तालुका कृषी अधिकारी जीभकाटे,यांचे प्रमुख उपस्थितीत झालेले कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार एन. एम. ठाकरे, यांनी केले,
याप्रसंगी मांग गारुडी समाजातर्फे जिल्हाधिकारी प्रदीप नायर व उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तर मुंडीकोटा येथील मांग गारुडी समाजाचे कार्यकर्ते प्रकाश शेंडे, नथ्थू बिसने, ज्ञानेश्वर उमे यांना जिल्हाधिकारी यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड यांनी आम्ही घेतलेले शिबिरात ७००० पैकी 641 नागरिकांना जात प्रमाणपत्र देण्यात येत असून उर्वरित प्रकरणी योग्य ती कार्यवाही करून तसेच या नंतरही परिसरातील नागरिकांचे येणारे अर्जावर योग्य ती कार्यवाही करून जात प्रमाणपत्र देण्याचे काम सुरूच राहील असे सांगितले .